__ मुंबई - मेटालॉजीच्या सर्वेक्षणातून देशातल्या सर्वात प्रदूषित असणाऱ्या राज्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून राज्याचा चौथा क्रमांक असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर देशात वाढत असणाऱ्या प्रदुषणामुळे नागरिकांचे जीवनमान साडेतीन वर्षांनी घटत असून प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांच्या एकूण संख्येपैकी १० टक्के मृत्यूहा महाराष्ट्रातील नागरिकांचे असल्याचे यात सांगण्यात आले आहे. दरम्यान, या सर्वेक्षणात उत्तर प्रदेश हे राज्य पहिल्या क्रमांकावर असून इथे प्रदूषणामुळे मृत्युचे प्रमाण हे १५ टक्के आहे.
प्रदूषित राज्यांत महाराष्ट्राचा चौथा नंबर