पुण्यश्लोक अहिल्यादेवी माँसाहेबांचा राज्यकारभार
माझ्यासह सर्व राज्यकर्त्यांना प्रेरणादायी, मार्गदर्शक- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रनिर्मात्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास, स्मृतीस मी वंदन करतो. विनम्र अभिवादन करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी माँसाहेबांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करत असताना त्यांनी त्याकाळात भारतभर केलेल्या विकास कामांचा डोंगर नजरेसमोर उभा राहतो. प्रजाहितदक्ष राज्यकर्ता कसा असावा, हे त्यांनी कार्यातून दाखवून दिलं. स्वत:च्या संस्थानाबाहेरही लोकहिताची कामे केली. देशात ठिकठिकाणी रस्ते, देवळं, विहिरी, तलाव, नदीघाट, धर्मशाळेसारख्या असंख्य सोयीसुविधा निर्माण केल्या, त्या आजही तितक्याच भक्कमपणे उभ्या आहेत. अहिल्यादेवींनी दूरदष्टीनं निर्माण केलेल्या या सोयीसुविधांनी देशवासियांच्या मनात राष्ट्रनिर्मितीची भावना रुजवण्याचं मोलाचं काम केलं, असे पवार यांनी म्हटले आहे.
पवार म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महान योद्धा होत्या. कुशल प्रशासक, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष, दानशूर राज्यकर्त्या होत्या. मुलकी आणि लष्करी प्रशासन वेगळे करुन कुशल राज्यकारभाराची चुणुक त्यांनी दाखवली होती. महिलांच्या सक्षमीकरणाचं काम त्यांनी त्याकाळात केलं. महिलांना शिक्षण, प्रशिक्षण, अधिकार दिले. शेतकऱ्यांवरील, व्यापाऱ्यांवरील अन्याय दूर करुन त्यांना प्रोत्साहन दिलं. लोककला, कलावंतांना आश्रय दिला. उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्विकारलं. अहिल्यादेवी महान राज्यकर्त्या होत्या, तितक्याच थोर विचारवंत होता, त्यांचे विचार सुधारणावादी, अंधश्रद्धेवर प्रहार करणारे होते. त्यांच्या विचारांचं, राज्यकारभाराचं कौतुक जगभरात होत आलं आहे. यातूनंच त्यांचं निर्विवाद श्रेष्ठत्वं सिद्ध होतं.
अहिल्यादेवींच्या शौर्य, पराक्रम, आदर्श राज्यकारभारामुळे मराठा साम्राज्याची किर्ती देशातच नव्हे तर जगभरात पोहचली, याचंही स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी माँसाहेबांनी त्याकाळात घेतलेला प्रत्येक निर्णय व केलेलं प्रत्येक कार्य हे माझ्यासह, प्रत्येक राज्यकर्त्याला प्रेरणा, मार्गदर्शन देत राहील. मी त्यांच्या महान कार्याला, पवित्र स्मृतींना वंदन करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून आरोग्याचं रक्षण करुया…
जागतिक तंबाखुविरोधी दिन. जागतिक तंबाखुविरोधी दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचा ठाम निर्धार करुया.. आपले कुटुंबिय, नातेवाईक, मित्र, परिसरातील नागरिकांनी सुद्धा तंबाखूच्या सेवनापासून दूर रहाण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्पही यानिमित्तानं सर्वांनी करुया. तंबाखूपासून दूर राहूया, आरोग्यदायी जीवन जगूया…
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...