आई चन्नम्मा यांनी समाजकार्याचे बालकडू दिले

आई चन्नम्मा यांनी समाजकार्याचे बालकडू दिले - भिमेश मुतूला



 


मुंबई प्रतिनिधी : विशेष कार्यानुभव


• सन २०१३ ते सन २०१५ या कालावधीत नागरिक संरक्षण दल(Civil Defence Corps), मुंबई अंतर्गत क्षेत्ररक्षक म्हणून मानवसेवी पदावर राहून देशसेवा केली


• भारतीय नौवहन मार्फत अंदमान निकोबार येथे २ वर्षे सेवा केली.


समाजसेवेची प्रेरणा


सन २०१५ साली मी सेवेवर असताना माझे वडील स्व. नारसप्पा मुतुला वय ५२ वर्षे याचे कॅन्सर सारख्या आजाराने अकाली निधन झाले. अत्यंत हलाकीची परिस्थितीत माझी आई नाव चन्नम्मा मुतुला हिने घरकाम करून शिक्षणाचे आणि समाजासाठी कार्य करण्याचे बाळकड़ पाजले. ३ वर्षे वडिलांना झालेल्या कॅन्सरसारख्या ददर्म्य आजारात उपचार घेताना करावी लागलेली आर्थिक कसरत आणि आईची हतबलता पाहून सर्व प्रकारच्या आजाराने त्रस्त रुग्णांना मदत करण्याचा ध्यास मी धरला. आज रुग्णांची मदत करताना माझ्या वडिलांची सेवा केल्याचा आनंद मिळतोच शिवाय या माध्यमातून समाज सेवा करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले आहे.


 माझ्या समाजसेवेचे आधारस्तंभ


             स्थानिक रहिवाशी असलेल्या मित्रांनी मिळून "उत्कर्ष सामाजिक सेवा संस्था" स्थापन करून स्थानिक लोकांना शिक्षण सेवा व वैद्यकीय उपचार मोफत/मुबलक सोयीसह कमी पैशात मिळून दिले. शैक्षणिक सवलती आणि जागरूक बनविण्याकरिता. या समाजकार्याच्या प्रवासात माझ्या सामाजिक कार्याला दिशा आणि गती देणारे माझे गुरु श्री ओमप्रकाश सदाशिव शेटे सर माजी. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख विशेष कार्यकारी अधिकारी यांची भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन मी आजतोवर ५० पेक्षा जास्त आरोग्य तपासणी शिबिरांचे मुंबईतील झोडपडपट्टीत आयोजन करून सुमारे ५००० रुग्णांची मदत केली. __माझ्या या कार्याची दखल घेत मला महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कृत महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना, मुंबई चे अध्यक्षपद बहाल केले. या माध्यमातून जबाबदारीरित्या केलेल्या माझ्या समाज कार्याचा आढावा घेऊन नुकतीच माझी निवड महाराष्ट्र राज्य रुग्ण सेवक संघटनेच्या महासचिव पदी झाली आहे.


समाजकार्याचा थोडक्यात आढावा.


• सन २०१५ पासून गरीब रुग्णांना विविध माध्यमातून मदत मिळवून दिली.


• खाजगी, शासकीय आणि निम. शासकीय रुग्णालयातील साई - सुविधांची जन - सामान्यांना माहिती देऊन रुग्णालय प्रशासनाला सर्व सुविधा गरिबांपर्यंत पोचविण्याकरिता (सहज व विनामूल्य ) भाग पाडले.


• आरोग्य दत्तक योजनेअंतर्गत मी ज्योती सिंग नामक मक- बधिर ३ वार्षिक अनाथ बालिकेचा कानाचे ७ लाखाच कोकिलर इंप्लांट सर्जरी मोफत करून दिली तसेच शिक्षणाची व आरोग्याची जबादारी घेतली आहे.


• याच योजनेअंतर्गत वारकरी संप्रदायातील मुलबाळ, नसलेले वृद्ध दांपत्य श्री. प्रकाश खोतु दळवी रा. जाके ग्राम, ठाणे यांचा कर्करोग साठीलागणारे खर्च ४,७०,०००/-न भरत मोफत उपचार मिळवून दिली. आणि दाम्पत्याचा मी आरोग्यासाठी दत्तकपुत्र आहे.


• माहे २३ जुन २०१९ मध्ये माजलगाव, जि. बीड येथील ५००० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहायता कक्षामधून मोफत बियाणे वाटप केले व मी मुंबईहुन माझ्यातर्फे ५०० शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करून दिले.


• महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजनेअंतर्गत व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून गरजू आणि गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारात आर्थिक मदत मिळवून दिली.


• मुंबई परिसरातील व आजूबाजूच्या समाजसेवक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिकिया ___ व्यक्तीच्या मदतीने अनेक गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रियेत आर्थिक आधार बनण्याचे कार्य केले.


• सार्थक रामचंद्र रायदे वय २ वर्षे रा.लांजा जि. रत्नागिरी हा बालक तीव्र घातक निमोनिया आजराने मुंबई नानावटी रुग्णालय पी.आय.सी. यु. मध्ये उपचार घेत असता सदर प्रकरणाची माहिती स्थानिक आमदार श्री.पराग अडवाणी यांच्या पत्राद्वारे माहितीवर या शेतकरी बालकाचा पुढील उपचाराकरिता रु. १३ लाख माफ करून केवळ २ लाखात त्याच्या उपचार करून दिला ( १८ जानेवारी २०१९) रिक्षा चालक इसम नामे दिनेश गुप्ता यांचा १८ वर्षीय मुलगा नामे दीपक गुप्ता हा ब्लड कॅन्सर सारख्या दुदर्म्य आजाराने त्रस्त होता. त्याच्या खाजगी MPCT रुग्णालय येथे रु. १५ लाख माफ करून दिले. (२७ फेब्रुवारी २०१९) मंदिर पुजारी नामे श्री. भास्कर पुजारी यांचा १३ वर्षीय मुलगा श्रीदेश पुजारी याला Brain Stroke च्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या १५ लाखातून ५० टक्के रक्कम मोफत करून व उरलेली रक्कम वयक्तिकरित्या भरून दिली. (४ डिसेंबर २०१८)


• खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेताना मरण पावलेले पण उपचाराचे पैसे देणे शक्य नसलेल्या कुटुंबियांना मयत इसमाचे उपचार रक्कम न भरता शव मोफत मिळवून दिले.


• सिंदखेड राजा येथी हजरत गौस ए आजम वास्तगोर बाबा बहुद्देशीय संस्था सोबत जि. बुलढाणा व महाराष्ट्र राज्यातले ८००० पेक्षा जास्त नोंदणी झालेल्या कर्करोग रुग्णांसाठी २०/१२/२०१८ रोजी मोफत कर्करोग आरोग्य तपासणी/ उपचार शिबीर आयोजन करण्यात आला होता.


• मुंबईत प्रथमच ५०० झोपडपट्टीतील १० ते २६ वयोगट गरीब मुलींसाठी मोफत HPV लसीकरण व पालकांसाठी महाआरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये ३००० पेक्षा जास्त पालकांनी हजेरी लावून रुग्ण सेवेचा लाभ घेतला. तसेच ५०० गरीब मुलींना HPV लसीकरणासाठी ६०,००,०००/- निधी Sir H.N.Reliance Foundation Hospital यांच्याकडून उपलब्ध करून घेऊन गरीब रुग्नासाठी मोफत सेवा पुरवठा देण्यात आली. (११ जानेवारी २०२०) मी दिलेली वरील माहिती वास्तविक आणि खरी आहे असे प्रतिज्ञापूर्वक सांगतो.


भिमेश नारसप्पा मुतुला महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना महासचिव, मुंबई


भ्रमणध्वनी क्रमांक - ८४२४८४४६९२


 


  दिगंबर वाघ


               कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


                     घरी राहा, सुरक्षित राहा 
                     प्रशासनाला सहकार्य करा...