फुलंब्री तालुक्यातील बाभूळगावात वादळाने मोठे नुसकान
घरावरील पत्रे उडाले विजेचे अनेक खांबही कोसळला २ जण जखमी
फुलंब्री प्रतिनिधी : फुलंब्री तालुक्यातील बाबरा परिसरात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याने घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. विजेचे खांबही पडले आहेत.बाबरा बाभुळगाव लिहा व खामगाव परिसरातील अनेक ठिकाणी विजेचे खांब पडून विद्युत महामंडळाचे खूप मोठे नुकसान झाले आहेत.
बाभुळगाव (खुर्द) येथील साहेबराव मोरे यांच्या गावाच्या शेजारी असलेल्या शेतातील राहत्या घरावरील पत्रे उडाल्याने साहेबराव मोरे यांची पत्नी शांताबाई मोरे व त्यांची सून मंदाबाई बाळू मोरे हे जखमी झाले आहेत. यांना तात्काळ फुलंब्री येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या घरावर विजेचे खांब पडल्याने मोठे नुकसान झाले आहेत. यांच्या संसार उपयोगी साहित्याचे ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून याच गावातील भारती रवी पवार यांच्या घरासमोरील झाड पडल्याने त्यांची गायी जखमी झाली. तसेच विमलबाई मोरे यांच्या पपईच्या बागेचे दत्तू बखाळे यांच्या चिकूच्या बागेचे मोठे नुकसान झाले गणेश तुकाराम मोरे यांच्या घराचे बांधकाम सुरू होते त्याचीही भिंत कोसळली शांताबाई कडोबा भिवसने व रमेश महादू भिवसने यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत व रासायनिक खत पूर्णपणे भिजल्याने शेतीपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहेत.
याबाबत तहसीलदार यांनी तत्काळ पंचनामे करावे अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने केली जात असून याबाबत नुकसान भरपाई मिळावी.
🎤 याघटनेचे पंचनामे करण्यासाठी तहसिलदार यांना तात्काळ आदेश द्यावे तसेच तात्काळ नुकसान भरपाई देण्यासाठी पालकमंञी सुभाष देसाई फलोत्पन मंत्री संदीपान भुमरे अब्दुल सत्तार महसुल राज्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहेत. -- संगिता काकासाहेब मोटे माजी जि.प. सदस्य
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏