राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले असून राज्यपाल महोदयांना निरोगी, दिर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना केली आहे.
उत्तराखंडचे सुपुत्र असलेल्या भगतसिंह कोश्यारी साहेबांचं राज्यपाल या नात्याने महाराष्ट्राशी, महाराष्ट्रातील जनतेशी जुळलेलं नातं महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाईल, कोरोनासह राज्यावरील प्रत्येक संकटावर मात करण्याचं बळ देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...