शहीद जवान सुनिल काळे यांच्या कुटुंबीयांचे गृहमंत्र्यांकडून सांत्वन
मुंबई प्रतिनिधी : पुलवामा येथे शहीद झालेले सी.आर.पी.एफ.चे जवान सुनील दत्तात्रय काळे यांच्या पानगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील घरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. महाराष्ट्र शासन सदैव आपल्या पाठीशी आहे अशा शब्दात मंत्रीमहोदयांनी शहीद काळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. यावेळी आ.राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अन्य प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका,आपणच घेऊ आपली काळजी 🙏