NUJM खेड तालुका अध्यक्षपदी सुनील थिगळे यांची निवड
NUJM खेड तालुका अध्यक्षपदी जय महाराष्ट्र न्यूज चे सुनील थिगळे यांची निवड
खेड प्रतिनिधी अनुराग पवार
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र ( NUJM )पुणे जिल्ह्याची खेड तालुका कार्यकारिणी बैठक आज खेड तालुक्यातील राजगुरूनगर इथे झाली. युनियनच्या राज्याच्या अध्यक्ष शीतल करदेकर,पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन चपळगावकर यांच्या आदेशाने जिल्हा कार्याध्यक्ष-रायचंद शिंदे यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ पत्रकार किशोर भगत यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा आणि
नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली
खेड तालुका अध्यक्षपदी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सुनील थिगळे, कार्याध्यक्षपदी-दै लोकमतचे चाकण प्रतिनिधी चंद्रकांत मांडेकर, उपाध्यक्षपदी- सोशल मिरर चे संपादक किशोर भगत,सचिवपदी- दैनिक सकाळ चे कडूस प्रतिनिधी महेंद्र शिंदे,खजिनदार पदी -लोकमतचे कुरुळी प्रतिनिधी विजय मु-हे, कायदे सल्लागार पदी -पुणे ब्रेकिंग न्यूज चे संपादक अँड. निलेश आंधळे यांची निवड करण्यात आली.
युनियनचे सदस्य पुढीलप्रमाणे:- रोहिदास गाडगे Etv भारत,नाजीम इनामदार दै पुण्यनगरी-राजगुरूनगर , शरद भोसले लोकमत-म्हाळुंगे, रवींद्र साकोरे लोकमत-काळूस,किशोर गिलबिले सरपंचनामा वेब पोर्टल-राजगुरूनगर
दरम्यान कोरोना काळात झालेल्या पत्रकार संघटनेच्या बैठकीत सोशल डिस्टनसिंग पाळत, मास्क व सॅनिटायझरचाही वापर करण्यात आला.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏