राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर ११ जून रोजी ठिय्या आंदोलन..

राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर ११ जून रोजी ठिय्या आंदोलन..


जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन



औरंगाबाद प्रतिनिधी : औरंगाबाद शहराला भेट अनेक ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे आहेत अजिंठा,वेरूळ, बिबी-का मकबरा, खुलताबाद येथे औरंगाजेबाची कबर यासारखे अनेक आणि देश-विदेशातून अनेक प्रवासी नागरिक बघण्याचा आनंद घेत असतात यामध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचे मालक-चालक हे अगदी मनापासून मोलाचे सहकार्य करतात. ते ही वाजवी दराने वाहन उपलब्ध करून देतात.अशी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक वाहनचालक आपली वाहने ही उपलब्ध करून देतात. त्यांच्या मदतीला जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था आली असून या संस्थेचे उद्दिष्टे फक्त आणि फक्त आपल्या वाहन चालक बांधवांना कुठेही मदत करणे जेणे करुन आमच्या बांधवांचे हाल होणार नाही. वाहनचालकांना कुणीच वाली नाही ना सरकार ना प्रशासन म्हणून आपण या संस्थेची स्थापना केल्याचे संजय हाळनोर संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले.
         आता कोरोना (कोविंड-१९) मध्ये आमच्या सर्व वाहनचालक बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहेत अनेक वाहने ही कर्ज घेऊन घेतली आहेत. फायनान्स कंपन्या आमच्याकडे हाप्तेत्यासाठी वारंवार तगादा लावत आहेत. सरकारने कोरोना मध्ये तीन महिने हप्ते घेऊ नये असे जाहीर केले होते. असे असून सुद्धा मात्र फायनान्स कंपन्या आम्हाला असा मानसिक त्रास देत आहेत यामध्ये आमच्या एका वाहन चालकाने आत्महत्या केली आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देऊन आमच्या व्यथा कळवल्या होत्या. हे पत्र नव्याने स्थापन झालेल्या सचिवालय कक्ष येथे दिले होते. हे कार्यालय प्रत्येक विभागामध्ये स्थापन करण्यात आले आहेत यामध्ये आपण सर्व व्यवसायांना कोरोना मधून बाहेर पडण्यासाठी मदत जाहीर केली होती. आमच्या वाहनचालकांना ही आपण फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याची विनंती केली होती. यामध्ये वाहनचालकांना ५५०० ते ६००० रुपये इतका तुटपुंजा पगार देण्यात येतो यामुळे आमचे कुटुंब ही जगण्यासाठी पण तात्काळ मदत करावी अशी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने मागणी करण्यात आली होती. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालया औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता याबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे यांनी सांगितले. ठिय्या आंदोलनासाठी अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहोत. संजय माणिकराव हाळनोर संस्थापक अध्यक्ष  उपाध्यक्ष संतोष काळवणे  लक्ष्मण वाघ बाबरेकर रविंद्र शेळके  रमेश कोलते  सुरेश मामा गायकवाड  लक्ष्मण सोनवणे  दिलीप जैस्वाल  लक्ष्मण शेंडगे  बाळु आवसरमल  ज्ञानेश्वर कदम  जावेद शेख  अर्जुन राठोड  जयसिंग बेळगे  राहुल पवार  शिवाभाऊ त्रंबके चरणसिंग  राजपुत सागरसिंग राजपुत  अशोक शहाणे  ज्ञानेश्वर ठोंबरे  भाऊसाहेब येळवे  मधुकर खंबाट  दत्ताभाऊ म्हेत्रे  नजिरभाई शेख  सुनील आप्पा  बंडू आढाव  राजु गाडेकर.


प्रशासन हे स्वतःच्या आर्थिक हितसंबंधांना साठी वाहनचालक व मालक यांना त्रास देत आहेत. अनेक परिवहन अधिकारी नियमबाह्य पद्धतीने पावत्या देत आहेत तसेच निवडणूक काळामध्ये जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी पांढऱ्या नंबर प्लेट ची वाहने भाड्याने घेतली होती. --जसवा कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य


⚫ हे निवेदन आम्ही १९ मार्च २०२० रोजी सचिवालय कक्ष औरंगाबाद विभाग यांना दिले होते परंतु हे निवेदन यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठविले नसावे.
⚫आतापर्यंत आम्हाला कोणतीही मदत केली नाही आणि हप्तेभरण्यासाठी फायनान्स कंपन्या वारंवार मानसिक त्रास देत आहेत एका वाहन चालकाने या त्रासामुळे आत्महत्या केली आहेत.
⚫ आत्ता आम्ही ११ जून २०२० रोजी ११ वाजेला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करणार आहोत.


     --  संजय हळनोर संस्थापक अध्यक्ष जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्


     दिगंबर वाघ


               कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


                 घरी राहा, सुरक्षित राहा 
                 प्रशासनाला सहकार्य करा...