जुम ॲप (zoom app) वापरताना सावध राहा.
महाराष्ट्र सायबर विभाग नागरिकांना आवाहन
zoom app वापरताना सावध राहा
मुंबई प्रतिनिधी : सध्या काळात बरेच नागरिक Work From Home करत आहेत.ऑनलाईन मिटींग्ज करिता वापरायला सोपे असल्याने zoom या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे.सायबर भामट्यांनी zoom app सदृश्य काही malware व फेक अँप्स बनवली आहेत. त्यामुळे हे ॲप वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे.असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे. आपल्या सहकाऱ्यांबरोबरच्या ऑनलाईन मिटींग्ज करिता zoom, microsoft meetings, skype , cisco webex इत्यादी सॉफ्टवेअरस/ॲप वापरली जात आहेत. zoom त्यामध्ये वापरायला सोपे असल्याने या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे .
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विशेष करून zoom app वापरणाऱ्यांना आवाहन करीत आहे, कि हे ॲप वापरताना सावध राहा. सायबर भामट्यांनी zoom app सदृश्य काही malware व फेक अँप्स बनवली आहेत. तुम्ही जर ती डाउनलोड केलीत तर तुमच्या सर्व मिटींग्ज रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते व तुमच्या device (मोबाईल /संगणक) चा ताबा देखील हे सायबर भामटे घेऊ शकतात .
तरी सर्व नागरिकांनी झूम ॲप हे अधिकृत वेबसाईट किंवा प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करावे . शक्यतो कुठलीही confidential माहिती अशा मिटींग्समध्ये बोलणे टाळावे किंवा संबंधित लोकांशी थेट बोलूनच त्यांना हि माहिती द्यावी . मिटिंग ऍडमिनने मिटिंगचे Id व पासवर्ड हे शक्यतो संबंधित व्यक्तींनाच थेट कळवावेत ,तसेच सदर पासवर्ड हा थोडा क्लिष्ट ठेवावा जेणेकरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस तो समजण्यास कठीण जाईल. तसेच संबंधित मिटिंग ऍडमिन /होस्टने फक्त मिटिंगच्या विषयाच्या संबंधित व्यक्तींची login request accept करावी.
पुढील बाबी लक्षात ठेवा
तसेच तुम्ही जर मीटिंग होस्ट असाल तर पुढील बाबी पण लक्षात ठेवणे गरजेचे आहेत
१) तुम्हाला जो random मिटींग id व पासवर्ड मिळेल त्याचाच शक्यतो वापर करा, तुमचा कुठलाही id किंवा पासवर्ड वापरू नका .
२) तुम्ही मिटींग setting अशा प्रकारे बदल करा कि तुमच्या शिवाय मिटींग मधील अन्य कोणीही व्यक्ती ती रेकॉर्ड करू शकणार नाही .
३) मिटींग मध्ये सर्व अपेक्षित व्यक्तींनी login केल्यावर सदर मिटींग लॉक करा जेणेकरून अन्य कोणी व्यक्ती त्यात अनाहूतपणे login करू शकणार नाही .
४) मिटिंग setting अशी करा कि तुमच्या आधी व तुमच्या परवानगीशिवाय कोणी त्यात login करू शकणार नाही.
५) तुम्ही ,जर काही कारणाने मिटींग सोडून जात असाल किंवा मिटिंग संपली असेल तर leave मिटींग चा option न वापरता end मिटींगचा option वापर करा .
६) मिटिंगची लिंक id व पासवर्ड ओपन फोरम वर शेअर करू नका. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...