अवघ्या ४ तासात १३ हजार १४७ नोंदणी

महाजॉब्स संकेतस्थळ : अवघ्या चार तासात


13 हजार नोकरी इच्छुकांची तर १४७ उद्योगांचीही नोंदणी



मुंबई प्रतिनिधी :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेल्या "महाजॉब्स" हे संकेतस्थळावर अवघ्या चार तासातच सुमारे १३३०० हून अधिक नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी केली.  


    राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि त्याचबरोबर उद्योजकांनाही कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. याला लोकार्पणाच्या पहिल्याच चार तासात मिळालेले प्रतिसाद प्रचंड आहे. संकेतस्थळाचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश पूर्ण करण्याबरोबच राज्यातील उद्योगांची चाके पुन्हा त्याच गतीने धावण्यास मदत होणार आहे.  http://mahajobs.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर जाऊन तरूणांना आणि उद्योोजकांना नोंदणी करता येणार आहे.


            कोरोना महामारीमुळे राज्यात लागू झालेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविली जात असून मिशन बिगिन अगेनअंतर्गत अनेक सवलती देण्यात येत आहेत. राज्यातील उद्योग सुरू व्हावेत यासाठी परवानग्या देण्यात आल्या असून हजारो उद्योग सुरू झाले आहे. एका बाजुला तरूणांना काम नाही आणि दुसऱ्या बाजुला उद्योजकांना मनुष्यबळ नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभाच्या वतीने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून त्याचा फायदा हजारो तरूणांना आणि उद्योजकांना होणार आहे.


      दिगंबर वाघ  


       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏