साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती'
करिता ९ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी :मुंबई शहर-उपनगर जिल्हयातील मातंग समाजातील मांग, मातंग. मिनी मादीग, मादींगा, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी, १२वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी उत्तीर्ण इ. करिता महामंडळाकडुन सरासरी ६० पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडुन "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती' करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ०३ ते ०५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, रेशनकार्ड,आधार कार्ड,शाळेचा दाखला,मार्कशीट, २ फोटो. पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ.सह दोन प्रतित आपले पुर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), मुंबई-गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१ या पत्त्यावर दि. ०९ ऑगस्ट, २०२० पर्यंत अर्ज करावा, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या),जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏