मुंबई उपनगर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना संकेतस्थळावर
माहिती नोंदवीण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी : राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि मुंबई उपनगर जिल्ह्यातील आतापर्यंत नोंदणी केलेल्या बहुसंख्य उमेदवारांनी आपल्या आधार क्रमांकाची नोंद केलेली नाही. तरी अशा उमेदवारांना आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांकही जोडावा लागणार आहे, अन्यथा 15 ऑगस्ट नंतर त्यांची नोंदणी रद्द होईल, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर कार्यालयामार्फत कळविण्यात येत आहे.
तरी उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जॉब सिकर ऑप्शनमध्ये नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून आधार क्रमांक तथा नोंदणी अद्यावत करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर यांनी केले आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏