जे. वाटुमल साधुबेला महिला महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन
उल्हासनगर प्रतिनिधी : साधुबेला एज्युकेशन सोसायटीच्या जे. वाटूमल साधुबेला महिला महाविद्यालय, उल्हासनगर मधील ग्रंथालय व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने
ग्रंथालय शास्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिम्मित एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी करण्यात आले असून या कार्यक्रमाचा विषय "बौध्दिक मालमत्ता अधिकार : पेटंटची तयारी आणि नोंदणी ” या विषयावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी १५०० प्राध्यापकांनी आतापर्यंत जगभरातून ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे. यामध्ये अमेरिका, बांगलादेश, नेपाळ, इराक, इराण पाकिस्तान, फिलिपाईन्स, बांगलादेश, इतर देशातील सहभागी असून या कार्यक्रमामध्ये डॉ. कांतीलाल नागरे बीजभाषण देणार असून पूजा मेनन यांचे व्याख्यान होणार आहे दोन्हीही व्याख्याते पेटंट या विषयात निष्णात आहेत असे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ. दत्तात्रय काळबांडे यांनी सांगितले. तर या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. वसंत माळी यांनी केले. सदरील कार्यक्रम हा youTube वरून प्रदर्शित करण्यात येईल.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏