माणगांव येथील महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक
मुंबई प्रतिनिधी : उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये माणगांव येथील महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक झाली. महिंद्रा कंपनीचे माणगांव येथील युनिट बंद झाल्यानंतर कोरोनाकाळात तेथील कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने विचार करावा. त्यांच्या वयाप्रमाणे व अनुभवाप्रमाणे माणगांव व्यतिरिक्त इतर ठिकाणच्या युनिटमध्ये पुढे सेवेत घेण्यात यावे, असे राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले.राज्यात उद्योगाला प्रोत्साहन देतांनाच अशाप्रसंगी कामगारांना न्याय मिळावा यासाठी कंपनीने जुन्या अनुभवी कर्मचाऱ्यांना भविष्यात प्राधान्य द्यावे असेही राज्यमंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.यावेळी माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याबाबत कंपनीकडून सहानुभूतीपूर्वक फेरविचार व्हावा, असे मत मांडले.
या बैठकीला स्थानिक कामगार संघटनेचे पदाधिकारी व महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी आदींची उपस्थिती होते.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..