मुरूड व रोहा तालुक्यामध्ये १७ गावांतील जमिनी अधिसूचित
मुंबई प्रतिनिधी : मुरूड व रोहा तालुक्यामध्ये 17 गावामधील एकूण 1994.969 हे.आर. क्षेत्र औषध निर्माण उद्यान (bulk Drug Park) ची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत अधिसूचित करण्यात आले असून या ठिकाणी bulk Drug Park विकसीत करण्याचे प्रस्तावित आहे.अशी माहिती उद्योग विभागाने दिली आहे. रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन निर्णय क्र.टीपीएस 1219/150/प्र.क्र.7819/नावि.12, 19.1.2019 अन्वये रायगड जिल्ह्यामधील 40 गावांमधील अंदाजे 13408.473 हे.आर. जमीन एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी सिडकोने अधिसूचित केले होते.
केंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाच्या 2 जून 2020 च्या अधिसूचनेनुसार औषध निर्माण विभागाने औषध निर्माण उद्याने विकसीत करण्याकरिता प्रोत्साहन देण्यासंदर्भातील योजनेनुसार रोहा व मुरूड तालुक्यातील 17 गावामधील एकूण 1994.969 हे.आर. क्षेत्रावर औषध निर्माण उद्याने (bulk Drug Park) ची स्थापना करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळामार्फत सिडको यांना हे क्षेत्र विनाअधिसूचित करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यानुसार सिडकोने हे क्षेत्र विनाअधिसूचित केले आहे.
महाराष्ट्र राज्यात मेगा रिफायनरी तथा पेट्रोकेमिकल प्रकल्पाकरिता राजापूर तालुक्यातील 14 गावातील एकुण 5461.465 हे.आर क्षेत्र तसेच Crude Oil Terminal (COT) and Desalination Plant साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये व रामेश्वर येथील एकूण 405.559 हे.आर. क्षेत्र 18.5.2017 रोजी अधिसूचित करण्यात आले होते.
परंतु रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनास अधिसूचित केलेल्या जागेच्या भूसंपादनास भूधारकांच्या व तेथील संघटनेचा प्रचंड विरोध असल्याने तेथे मोजणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर हे संपूर्ण क्षेत्र 02.03.2019 रोजीच्या अधिसूचनेद्वारे विनाअधिसूचित करण्यात आले आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..