वर्दीतील स्त्रीशक्ती

पोलीस कॉन्स्टेबल रेखा काळे


नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव



मुंबई प्रतिनिधी : कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे.त्या  स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न ..


शक्तीचे, बुद्धीचे, नीतीचे,


   भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते.महाराष्ट्र पोलीस दलातील असामान्य कार्य करणार्‍या स्त्री शक्तीची ओळख करुन देत असताना मला मनस्वी आनंद होत आहे.


रेखा काळे


    मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल रेखा काळे या प्रसूती रजेवर आपल्या गावी बेलवंडी,श्रीगोंदा येथे गेल्या होत्या. तिथे त्यांना प्राथमिक शाळेमध्ये क्वारंटाईन व्हावे लागले. काळे यांनी पतीच्या मदतीने क्वारंटाईन असलेल्या शाळेची साफसफाई केली आणि झाडांना पाणी घालून शाळेचा परिसर हिरवागार केला. हिरवा रंग हा निसर्गाशी, भूमीशी असलेले नाते दर्शवितो. काळे यांनी आपल्या या कार्यातून समृध्दीचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून काळे यांच्या अभिजात कार्याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्त्रीशक्ती अनेक प्रकारे समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहेत, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.


दिगंबर वाघ             


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..