ज्ञानदीप संस्थेतर्फे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर वाटप
मुंबई प्रतिनिधी :कोरोनाशी लढा देण्यासाठी शासन व प्रशासनासोबत सेवाभावी संस्थांचे उल्लेखनीय योगदान लाभले आहे. आज ज्ञानदीप नागपूर या संस्थेतर्फे देण्यात आलेली ऑक्सिजन मशीन तसेच व्हेंटिलेटर आदी साहित्य कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी व परिणामकारक उपाययोजनांमुळे मृत्यू व रुग्णवाढीचा दर नियंत्रणात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ज्ञानदीप संस्थेतर्फे आठ ऑक्सिजन यंत्र तसेच व्हेंटिलेटर कन्व्हर्टर यंत्र पाच पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते देण्यात आल्या. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी., जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यपालन अधिकारी योगश कुंभेजकर, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जी. मो. शेख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, ज्ञानदिप संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर वर्धने, सचिव प्रवीण महाजन, बालरोग तज्ञ डॉ. राजेंद्र सावजी, रसिका जगदळे, वृंदा महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेले पॅन ऑक्सिजन मशीन व इलेक्ट्रॉनिक व्हेंटिलेटर कन्व्हर्टर ज्ञानदीप संस्थेतर्फे ग्रामीण, अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा पुरविणाऱ्या संस्थांना देण्यात आल्यात. मशिन स्विकारण्यासाठी महान ट्रस्ट मेळघाटचे डॅा. भारद्वाज आणि अवि निंबाळकर, मातृ सेवा संघ महालचे डॅा. चौरोसिया मॅडम, सचिव भाटे मॅडम, प्रशासकीय अधिकारी श्री. सचिन सरोदे. नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालया तर्फे डॅा. राजेंद्र सावजी, स्वामी विवेकानंद हॅास्पीटलचे डॅा. गुप्ता, डॉ. आमटे फाउंडेशनचे जितेंद्र नायक., हेमलकसा, गडचिरोली, डॅा. दंदे फाऊन्डेशन नागपूर , इंदिरा गांधी मेडिकल कॅालेज नागपूरचे डॅां. वैशाली शैलगांवकर तसेच महानगरपालिका हॅास्पीटल या संस्थांना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते देण्यात आले.
प्रास्ताविकेत प्रवीण महाजन यांनी माहिती देताना ज्ञानदिप ही सामाजिक संस्था असून या संस्ऱ्थेव्दारे हॅन्डीकॅप मुलाचे ॲापरेशन, मुलांना शैक्षणिक साहित्य, गरीब, होतकरू मुलांना स्कॅालरशीप दिल्या जाते. कोविंड १९ चे संकट लक्षात घेता ज्ञानदीप संस्थेतर्फे ऑक्सिजन यंत्र व कन्व्हर्टर यंत्र आदी साहित्य ग्रामीण व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आले असून आज पालकमंत्र्याच्या शुभहस्ते कार्यक्रम होत आहे. आम्हाला नेहमीच समाजातील सर्वच स्तरातून मदत प्राप्त होत असते. आम्ही अव्हाण केले आणि अनेक दानशूर व्यक्तींचा हातभार लागला. एन. व्ही. शिंदे यांनी आपल्या पिताश्री व मातोश्री कै. वसंतराव व पदमावती वसंतराव शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दोन व्हेनटीलेटर मशिन दिल्याचे मला सांगताना आनंद होत आहे. त्याबद्दल पालकमंत्र्यांनी सुध्दा केलेल्या सेवाभाव वृत्तीचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन मोरेश्वर ढोबळे यांनी केले तर अभार प्रवीण महाजन यांनी मानले.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..