पर्यावरणयुक्त प्रदुषणमुक्त सर्वांनी काळजी घेऊन दिवाळी साजरी करण्याचे आवाहन संपादक संजय चौधरी यांनी केले
ठाणे प्रतिनिधी : महाराष्ट्रातील नागरिकांना तसेच वाचक वर्ग आणि वार्ताहर प्रतिनिधी यांनी आपली काळजी व सुरक्षित पर्यावरणयुक्त प्रदुषणमुक्त दीपावली साजरी करावी असे आवाहन कार्यकारी संपादक दिगंबर वाघ यांनी करून राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.दीपावलीच्या मंगल पर्वावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. करोनाचे गंभीर आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळी सुरक्षित, पर्यावरणयुक्त व प्रदुषणमुक्त वातावरणात साजरी करावी असे आवाहन करतो. दिवाळीच्या आनंदात किमान गरीबांना व उपेक्षितांच्या व्यक्तीला सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून ही दिवाळी खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होईल. हा प्रकाशोत्सव सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करावे असे आवाहन संजय चौधरी संपादक यांनी केले.
आपण सर्वजण कोरोना (कोविड-१९) सारख्या महामारी संकटातून बाहेर पडत असून आपणच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. आपले कुटुंब सुरक्षित आपले राज्य सुरक्षित आणि आपला देश सुरक्षित होईल.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..