वर्ष २०१९-२० साठी भविष्य निर्वाह निधी खात्यांची माहिती
सेवार्थ संकेतस्थळावर उपलब्ध
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र महालेखापाल (A&E)-१ कार्यालय, मुंबईतर्फे वर्ष २०१९-२० साठी भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) खात्यातील जमा रकमेसंबंधी स्लीप लेखा व कोषागरे संचालनालय यांना पाठविण्यात आली असून सदर माहिती महाराष्ट्र शासनाच्या SEVAARTH या संकेतस्थळावर http://sevaarth.mahakosh.gov.in येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्याची लिंक agmaha.cag.gov.in या AG कार्यालयाच्या संकेतस्थळावरही देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे जीपीएफ खाते धारक आपल्या जीपीएफ खात्यासंबंधी वर्ष २०१९-२० या वर्षासाठी आपल्या या स्लीप्स सदर संकेतस्थळावर पाहू शकतात किंवा डाऊनलोड आणि प्रिंट करू शकतात.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ११ जून २०२० च्या शासन निर्णय क्रमांक GPF-2019/Pr.Kr.61/Kr.24 अनुसार जीपीएफ विवरणपत्राची हार्ड कॉपी देण्याचे काम थांबविण्यात आले आहे जर जीपीएफ खात्यासंबंधी स्लीप मध्ये काही त्रुटी आढळल्यास उप महालेखापाल (निधी) किंवा महालेखापाल(A&E) यांच्याकडे संबंधित आहरण एवं संवितरण अधिकाऱ्यांमार्फत निर्दशनास आणून देता येतील. जन्म तिथी किंवा बँकेत जमा/वजा केलेल्या रक्कम किंवा इतर तत्सम माहिती स्लिपवर मुद्रित करण्यात आली नसेल तर याची सूचना प्रधान महालेखापाल(A&E)-१, महाराष्ट्र, मुंबई यांच्याकडे पडताळणी व सुधारित माहिती देण्यासाठी पाठवावी. त्याचप्रमाणे जीपीएफ खातेधारक अशा त्रुटीसंबंधी माहिती agaemaharashtra1@cag.gov.in या इमेल वर ही पाठवू शकतात, अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..