बृहन्मुंबई म.न.पा येथील अधिकार्यांवर आयुक्तांचे नियंत्रण नसल्याने मनमानी पद्धतीने कामकरत आहेत
- दिगंबर वाघ सरचिटणीस कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई.
मुंबई प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या सुरक्षा विभागांमध्ये प्रभारी पदे देण्याची एक प्रकारे चढावर चालली आहेत. ज्यांना कामाच्या पद्धती माहिती नाहीत अशांना ही कामे दिली जाते.आपल्या कार्यालयातील किंवा कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांची आजपर्यंत माहिती अद्यावत करण्यात आलेली नाही. माहिती अधिकार अधिनियम-२००५ हा कायदा लागू झाल्यानंतर १२० दिवसांमध्ये प्रत्येक विभागाने आपल्या कार्यालयातील संपूर्ण माहिती प्रगट करणे अपेक्षित होते. हा कायदा लागू होऊन अनेक वर्षे उलटली तरी देखील आजपर्यंत अशा प्रकारची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत. या कायद्यातील कलम-४ च्या १ ते १७ बाबीनुसार नुसार सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्यांचे आदेश वेतन कुठे किती वेळ काम करतात याबाबतचे सक्षम पुरावे. कलम-५ नुसार पद निचित करणे गरजेचे होते. तरी नागरिकांनी मागणी करण्यापेक्षा कार्यालयाने अद्यावत करणे गरजेचे होते. परंतु ही माहिती आजपर्यंत बृहन्मुंबई मनपाने प्रसिद्ध केलेली नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहेत.
सुरक्षा विभागातील राजावाडी येथील अधिकारी कैलास सुपे हे राजावाडी रुग्णालयाच्या कार्यालयात कधी हजर असतात याबाबत यांच्या कार्यालयाकडे कुठलीही नोंद नाही. कारण हे अधिकारी कार्यालयात कधी कुणालाही भेटत नाहीत माहिती अधिकारात मागणी केली तर कार्यालय उत्तर देत नाही. काहीतरी थातुरमातुर उत्तरे दिली जातात तसेच यांची महिला कर्मचाऱ्यांना बरोबर वर्तन वागणूक ही असभ्य प्रकारची आहेत महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जाते सुपे यांनी अनेक कर्मचारी यांना पैसे घेऊन एकच पाळीमध्ये कामासाठी बोलावले जाते अनेक कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन रजा दिल्या आहेत त्यांना नियमानुसार काम करणे माहीत नसावे अशा प्रकारच्या अनेक तक्रारारी कोकण विभाग पत्रकार संघाकडे नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या आहेत.अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून चौकशी करण्यासाठी पत्रकार संघ आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार आहेत.
अधिक माहिती अशी की आयुक्त उपायुक्त व या विभागाचे प्रमुख असलेले प्रमुख सुरक्षा अधिकारी यांचे नियंत्रण नसल्यामुळे या विभागातील अनेक अधिकारी आपल्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांच्या हव्या त्याठिकाणी बदल्या करून घेतात तसेच त्याच ठिकाणी ओवरटाईम देऊ भ्रष्टाचार करतात ज्या ठिकाणी काहीच काम नसते ज्याठिकाणी काहीच काम नसते त्याठिकाणी ओवरटाईम दिला जातो इतर कर्मचाऱ्यांना मात्र ज्याठिकाणी जास्त कामाचा ताण आहेत अशा ठिकाणी पाठवले जाते. अधिकाऱ्यांचे नातेवाईक मात्र कुणी लिपिक म्हणून काम करतात तर कुणी वार्डमध्ये (ऑफिस) काम करतात आणि इतर कर्मचाऱ्यांना वेगळी वागणूक आहेत. मग त्यांच्या नातेवाईकांच्या बदल्या ? कशा होतात याचे उत्तर कोण देणार अनेक कर्मचाऱ्यांची मागणी आहेत की आम्ही कोरोना (कोंविड-१९) मध्ये रुग्णालयात कामे केली आहेत आता आमच्या वार्डामध्ये बदल्या कराव्यात परंतु असे होणार नाहीत कारण आमची वरिष्ठांना सोबत ओळख नाहीत आणि आम्ही पैसेही खर्च करू शकत नाही यामध्ये अतिरिक्त आयुक्त किंवा प्रमुख सुरक्षा अधिकारी यांनी लक्ष घालावे अशी अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली आहेत.
🔴 याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची बाजू जाणून घेण्यासाठी यांच्या कार्यालयातील २२६२०२५१ या क्रमांकावर फोन केला परंतु त्यांच्यापर्यंत तो दिल्याच जात नाहीत याचा अर्थ जबाबदार अधिकारी बोलण्यास तयार नाहीत आतातरी आयुक्त यांनी दखल घ्यावी.
🔴 आयुक्त यांच्याकडे कामाचा ताण असतो परंतु अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी व प्रमुख सुरक्षा अधिकारी यांनी लक्ष दिले असते तर अशा प्रकारचा अन्याय झाला नसता यांना यामधून काय आणि किती मिळते याची आयुक्तांनी तात्काळ चौकशी करून कैलास सुपे सारखे किती अधिकारी आहेत याचा शोध घ्यावा अन्यथा कोकण विभाग पत्रकार संघ उपोषण करेल. - संजय पाटील संस्थापक अध्यक्ष कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक- ९४०४४५३५८८
🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून
बचाव करा 🙏