वृत्तपत्रांच्या कार्यकारी संपादक यांना जीवे मारण्याची धमकी

इकबाल सिंह चहल साहेब आपल्या अधिकाऱ्यांना आवर घाला हे आमच्या पत्रकार बांधवच्या अंगावर येत आहेत - अण्णासाहेब कुळये मुंबई अध्यक्ष को.वि.प.स.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागातील सहा.सुरक्षा अधिकारी कैलास सुपे यांनी दिली जिवे मारण्याची धमकी

मुंबई प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागातील 'सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांची मनमानी' मथळ्याखाली १६ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीवर दिगंबर वाघ कार्यकारी संपादक तथा सरचिटणीस कोकण विभाग पत्रकार संघ यांना राजावाडी रुग्णालय घाटकोपर येथे कार्यरत असलेले सहा.सुरक्षा अधिकारी कैलास सुपे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की सुरक्षा विभाग वरळी यांच्या कार्यालयाकडे माहिती अधिकारात माहिती मागितली होती त्यावर ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती यावरून सुपे यांनी दिगंबर वाघ यांना कमरेच्या खालच्या भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहेत तसेच  'तू मला ओळखत नाही मी तुझी सुपारी देऊन तुला संपवून टाकेल' यांना कोणत्यातरी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठींबा असावा कारण यावर वरिष्ठ अधिकारी किंवा अतिरिक्त आयुक्त बोलण्यास तयार नाही आता आपले अधिकारी पत्रकारांच्या जिवावर उठले आहेत स्वतः गैरव्यवहार करायचे आणि ते प्रसिद्ध केले की त्यांना जीवे मारण्याची धमकी द्यायची ही तर हुकूमशाही पद्धत झाली आपले अधिकारी आपल्या नियंत्रणात किंवा नियमानुसार काम करीत नाहीत.

          दिगंबर वाघ यांच्या जिवाचे जर भविष्यात बरे-वाईट झाले तर त्यास कैलास सुपे सहा‌.सुरक्षा अधिकारीच जबाबदार राहील याची आयुक्त व या विभागाचे असलेले अतिरिक्त आयुक्त यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करावी.

⚫ आयुक्त महापौर यांना निवेदनाद्वारे कैलास तुपे यांना तात्काळ निलंबित करावे व यांनी कुणाच्या जीवावर धमकी दिली याची सुद्धा चौकशी करावी अन्यथा अमरण उपोषण करण्यात येईल याची आयुक्तांनी गांभीर्याने नोंद घ्यावी - संजय पाटील संस्थापक अध्यक्ष कोकण विभाग पत्रकार संघ

⚫ सुपे यांनी १७ डिसेंबर २०२० रोजी ६:०३ PM ला 9619163909 या मोबाईल क्रमांकावरून मला फोन करून अरेरावी व कमरेखालच्या भाषेचा वापर करून जीवे मारण्याची धमकी दिली माझ्यासह माझ्या परिवारातील सदस्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागल्यास त्यास कैलास तुपे सहाय्यक सुरक्षा अधिकारी हेच जबाबदार राहतील याची आयुक्त चहल यांनी नोंद घ्यावी - दिगंबर वाघ कार्यकारी संपादक तथा सरचिटणीस



दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक- ९४०४४५३५८८


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏