के.डी.एम.सीने केले १० माणूसकीच्या भिंतीचे उद्घाटन

 गरजू नागरिकांना सामाजिक संस्था आणि के डी एम सी यांच्या संयुक्त विद्यमाने कपडे वाटप - रामदास कोकरे उपयुक्त घकव्य





कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण (प), डोंबिवली पूर्व येथे उभारलेल्या माणूसकीच्या भिंतीनंतर आज सायंकाळी कल्याण पूर्व येथील ड प्रभागक्षेत्र कार्यालयाजवळ कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि सहयोग सामाजिक संस्था यांचे संयुक्त विदयमाने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त घकव्य रामदास कोकरे यांचे प्रमुख उपस्थितीत तिस-या माणूसकीचा भिंतीचा शुभारंभ करण्यात आला. या समयी संकलित झालेले कपडे लगेचच उपस्थित गरजू /गरीब व्यक्तिंना देण्यात आले.

         महानगरपालिका क्षेत्रातील गोर गरीब नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेच्या दहाही प्रभागात 10 माणूसकीच्या भिंती उभारण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. या कार्यक्रमा प्रसंगी ड प्रभागक्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे, जे प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पाटील तसेच कर्मचारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.





दिगंबर वाघ

कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८


🙏सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा🙏