संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील विषय, गणपूर्ती आणि इतिवृत्ताची भाषा याबाबत...
भाग १४
ॲड. विशाल लांजेकर
यांच्या लेखणीतून सोप्या भाषेत प्रश्न उत्तरे
दर आठवडयाला,दर सोमवारी...
मागील लेखात आपण वाचले की, सदस्य संख्या किती असेल तर
सर्वसाधारण सभा कशाप्रकारे संस्थेने भरविणे आवश्यक आहे. आजच्या लेखात तुम्हाला
तुमची संस्था योग्य त्या प्रकारे काम करत आहे का ? नसल्यास याबाबत तुम्ही हक्काने
व्यवस्थापन सदस्यांना प्रश्न विचारू शकता.
प्रश्न क्र. ६९) संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोणत्या विषयावर कामे केली जातात ?
२) समितीकडून मागील सहकारी वर्षाच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल तसेच मागील
सहकारी वर्षाचे उत्पन्न खर्चाचे व मागील सहकारी वर्षाच्या अखेरच्या दिवशीचा
ताळेबंद दर्शविणारे हिशोबपत्र स्वीकारणे व त्यास मंजूरी घेणे
३) वैधानिक लेखापरीक्षकाकडून मागील सहकारी वर्षाचा लेखापरीक्षा अहवालावर विचार करणे.
४) समितीकडून दोष दुरुस्ती अहवालावर विचार करणे व त्यावर कारवाई करणे.
५) पुढील आर्थिक वर्षासाठी विचारार्थ म्हणून वार्षिक अर्थसंकल्प सभेसमोर ठेवणे.
६) अंतर्गत लेखापरीक्षक आवश्यक असेल तर नेमणे व त्याचा मेहनताना मंजूर करणे.
७) संस्थेचे चालू वर्षाची वैधानिक लेखापरीक्षण करून घेण्यासाठी राज्य शासनाने मान्यता
दिलेल्या अधिकृत यादीमधील लेखापरीक्षकाची पुढील वर्षाकरीता नेमणूक करणे.
८) कलम ७५(२) खाली विहित वार्षिक अहवाल समितीकडून स्वीकारणे.
९) सहकार अधिनियम, नियम आणि संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेच्या
सर्वसाधारण सभेची मंजुरी, सहमती आवश्यक असलेली अन्य कोणतेही विषय विशेषकरून
निर्णय घेण्याची आवश्यकता असलेली प्रकरणे सभेसमोर ठेवणे.
१०) नोंदणी प्राधिकारी, वैधानिक लेखापरीक्षक, शासन, जिल्हाधिकारी, स्थानिक प्राधिकरण
किंवा कोणत्याही अन्य सक्षम प्राधिकारी यांजकडून आलेल्या महत्त्वाच्या पत्रव्यवहारांवर
विचार करणे.
११)निवडणुकीची योग्यवेळ नजीक आल्यावर त्या घोषित करणे व पार पाडणे.
१२) नियमित कार्यसूची समाप्त झाल्यानंतर ज्या विषयांना ठराविक मुदतीची नोटीस देणे
गरजेचे असते, असे विषय सोडून अधिनियम, नियम व उपविधी यांच्या तरतुदीअधीन
परवानगी दिलेली आहे असे विषय अध्यक्षांच्या परवानगीने सभे समोर मांडणे.
१३) सहकार विभागाकडून परिपत्रक/आदेश पत्र असेल तर त्या प्रमाणे करणे. आवश्यक
असलेले पोटनियम दुरुस्तीबाबत ठराव करणे.
१४) संस्थेने करावयाच्या मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीबाबत, सेवाशुल्क व इतर शुल्क वाढविणे बाबत.
१५) पूर्व सुचना देणे आवश्यक आहे असे विषय वगळून इतर आयत्यावेळी येणाऱ्या विषयाचा
सभेच्या अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने विचार करणे/ठराव करणे.
१६) सर्वसाधारण सभेची मंजूरी घेणे आवश्यक आहे असे इतर महत्वाचे विषय ठेवू शकते.
प्रश्न क्र. ७०) सर्वसाधारण सभेसाठी किती सभासद/व्यवस्थापन समिती सदस्य गणपूर्तीसाठी (कोरम) आवश्यक आहे ?
उत्तर: सर्वसाधारण सभेचा कोरम एकूण सदस्य संख्येच्या २/३ किंवा
२० यापैकी जी संख्या कमी असेल तेवढा असावा. मात्र सर्वसाधारण सभेचा कोरम पूर्ण
न झाल्यास दिलेल्या वेळेनंतर अर्धा तास सभा तहकूब करावी व तसे करून सुद्धा कोरम न
झाल्यास उपस्थित सभासद कोरमशिवाय सर्वसाधारण सभा घेऊ शकतात. मात्र अशा स्वरुपाची सुचना
विषय पत्रिकेत असणे आवश्यक आहे.
व्यवस्थापक समिती सदस्यांची संख्या ५ असल्यास कोरम ३, ७ असल्यास कोरम ४, ९ असल्यास कोरम ५ असावा.
प्रश्न क्र. ७१) सर्वसाधारण सभेचे संस्थेचे इतिवृत्त कोणत्या भाषेत असणे आवश्यक आहे ?
उत्तर: संस्थेचे इतिवृत्त मराठी/इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असणे आवश्यक आहे.
मागील लेखाबाबत अथवा आपल्या प्रश्नाबाबत अधिक माहितीसाठी
खालील इमेलवर संपर्क साधू शकता.
(ॲड. व्ही लॉ सोल्युशनस चे संस्थापक आहेत)
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
🙏 एक वचन तीन नियम 🙏
१) मास्क वापरा
२) हात धुवा ३) अंतर ठेवा