सार्वजनिक ठिकाणी कच-यामध्ये मेडिकल वेस्ट टाकणा-या साई डेंटल क्लिनिकचे डॉ.उपाध्ये यांचेकडून रु.10,000/- चा दंड वसूल !
कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण रेल्वे स्थानकाजवळील स्वच्छता गृहासमोर कच-यात पीपीई किट, मास्क, इंजेक्शन सापडले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे अशा आशयाच्या बातम्या काही वृत्तपत्रातून तसेच सोशल मिडियावर प्रसिध्द झाल्या आहेत. सदर बाबतीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदार कोकरे आणि प्रभारी आरोग्य निरिक्षक जगन्नाथ वड्डे यांनी समक्ष पाहणी करुन संबंधित साई डेंटल क्लिनिकचे डॉ. उपाध्ये यांनी मेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी टाकल्यामुळे त्यांच्याकडून रुपये 10,000/- चा दंड वसूल केला आहे.