कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
अभ्यासू पत्रकार संदिप जगदाळे यांचे निधन..
पुणे प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील मनमिळावु अभ्यासु युवा पञकार संदिप ज्ञानदेव जगदाळे यांचे गुरुवारी राञी 7 वाजुन 45 मिनिटांनी प्राणज्योत मावळली . ते 45 वर्षाचे होते मागील पंधरा वर्षापासुन सकाळमध्ये हडपसर भागांतील बातमीदार म्हणुन काम पाहत होते . कोरेगाव पार्क येथील पुणे ओंध शाळेमध्ये ते एमएसडब्ल्यु समाजसेवक या पदावर कार्यरत होते . अंत्यत मनमिळावु , स्वभावाचे संदिप हे गेल्या अनेक वर्षापासुन हडपसर भागांत पञकारिता करीत होते . कोरोनांच्या काळात देखील ते जबाबदारीने कर्तव्य बजवित होते बातमीदारीच्या माध्यांमातुन त्यांनी हडपसर भागातील अनेक विषय माडत आवाज उठविला होता विविध विषयांवर सातत्याने पाठपुरावा करुन त्या भागातील अनेक प्रश्न त्यांनी मागीं लावले होते . त्या भागातील सामजिक , राजकिय विषयांवर ते उत्कृष्टपणे बातमीदारी करीत होते . त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्था अणि संघटनानी त्यांना सन्मापञ देऊन गौरविले होते . त्यांच्या जाण्यांने विविध स्तरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे . आपल्या हडपसरचे दैनिक सकाळचे अभ्यासु पञकार संदिप जगदाळे यांच्या निधनांची दु . खद बातमी समजली एक सहदयीं , व्यक्तितमहत्व आपल्यातुन आज निघुन गेले . ईश्वर त्यांच्या आत्माला शांती देवो , जगदाळे कुटुंबियाना या दु . खातुन सावरण्यांची शक्ती मिळो , हीच प्रार्थना युवा पञकार संदिप ज्ञानदेव जगदाळे यांच्या प्रश्चांत आई , वडील , भाऊ , भावजय , पत्नी , मुलगा , दोन बहिणी असा परिवार आहे . रयत शिक्षण संस्थेच्या साधना विदयाल्यांतील शिक्षिका सारिका संदिप जगदाळे यांच्या त्या पत्नी आहेत . संदिप जगदाळे हे मुटीं ता . बारामती जि . पुणे येथील शेतकरी कटुंबातील होते . आपल्या कामाच्या माध्यांमातुन पञकारिता क्षेञांत वेगळी ओळख निर्माण केली होती . सुमारे 20 दिवसांपुवीं त्यांना कोरोनाची लागण झाली होती तेव्हापासुन त्यांच्यावर उपचार सुरु होते दरम्यान आज गुरुवारी सांयकाळी त्यांची प्राणज्योत मावळली . शोककुल . संभाजी गोसावी व पुरीगोसावी परिवार करंजखोप.