चित्रमहर्षी दादासाहेब फाळके वाहतूक बेटाचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई प्रतिनिधी : भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक, चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त  नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्या प्रयत्नाने हिंदमाता जंक्शन, दादर येथे नुतनीकरण केलेल्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके वाहतूक बेटाचे लोकार्पण मुंबईच्या महापौर  किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते आज ३० एप्रिल २०२१ रोजी पार पडले.याप्रसंगी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष  आदेश बांदेकर, आमदार  मनिषा कायंदे, माजी महापौर तथा नगरसेविका  श्रद्धा जाधव, एफ/ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त  गजानन बेल्लाळे उपस्थित होते.

      भारतीय चित्रपटसृष्टीला आज लाभलेल्या वैभवामागे चित्रमहर्षी दादासाहेबांनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी व केलेले परिश्रम आहेत. भारतात चित्रपटनिर्मिती करण्याच्या ध्येयापोटी त्यांनी लंडनमध्ये जावून चित्रपटनिर्मितीचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक कलात्मक तसेच तांत्रिक बाजू आत्मसात केल्या. 'राजा हरिश्चंद्र' हा मूकपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला. दादासाहेबांसारख्या मराठी माणसानं रचलेल्या पायावर आज भारतीय चित्रपटसृष्टी अनेक दृष्टीनं समृद्ध झाली आहे. दिमाखदार कामगिरी करत आहे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८