कोस्टल रोडच्या कामाची महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली पाहणी
त्यानंतर,महापौर किशोरी पेडणेकर संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून हे काम कश्या पद्धतीने सुरू आहे ते पाहणे तसेच दिलेल्या निर्धारित वेळेत काम पूर्ण होत आहे की नाही ? याची माहिती घेणे ही आमची जबाबदारी असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरातील रहिवाश्यांनी त्यांच्या परिसरातील रस्त्याच्या समतोलाबाबत शंका उपस्थित केली होती ? त्यानुसार आज पाहणी केली असल्याचे महापौरांनी सांगितले. टीबीएम ‘मावळ’ प्रगतीचे एक एक टप्पे सर करीत असून मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या ३३० मीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले असल्याचे महापौरांनी सांगितले. कोविड तसेच लॉकडाऊनच्या काळातही कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले.