सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घेतला प्रलंबित कामांचा आढावा - अशोक चव्हाण
चव्हाण म्हणाले की, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जी कामे सुरू आहेत, ती तातडीने पूर्ण करावीत. तसेच लोकप्रतिनिधींनी मागणी केलेल्या कामांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत जेणेकरून अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात येईल. भंडारा जिल्ह्यातील जे रस्ते खाणींशी जोडले जातात, अशा रस्त्यांचे कामे ही सिमेंट क्राँक्रिटने करण्यासंदर्भातही प्रस्ताव पाठवावेत.खासदार पटेल यांनी दोन्ही जिल्ह्यातील रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी केली. तसेच सर्व कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नुतनीकरणाचे तसेच भंडारातील प्रशासकीय इमारतीचे कामही तातडीने सुरू करावे, अशी मागणी यावेळी केली. आमदार सर्वश्री. कारेमोरे व चंद्रिकापुरे यांनीही रस्त्यांच्या कामांना निधी देऊन तातडीने कामे पूर्ण करण्याची मागणी केली.