महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्ही.एन. शिरोडकर प्रसूतिगृह येथील लसीकरण केंद्राची पाहणी केल्यानंतर संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ८० वर्षावरील नागरिकांचे ऑफलाइन पद्धतीने या ठिकाणी लसीकरण होत आहे, ही अत्यंत चांगली बाब असल्याचे महापौर म्हणाल्या.यामुळे या केंद्रावर कुठलाही गोंधळ न होता शांततेत लसीकरण होत असून इतर केंद्रांवर सुद्धा ८० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लसींचा मर्यादित स्वरूपात पुरवठा होत असल्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी पाहायला मिळत असून ज्या प्रमाणात लसीचा पुरवठा होईल त्या प्रमाणात लसीकरणाचा वेग वाढेल. कोणत्याही नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवणार नसून नागरिकांनी या संपूर्ण लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.
विलेपार्ले (पूर्व) येथील डॉ. व्ही.एन. शिरोडकर प्रसूतिगृह येथील लसीकरण केंद्राला महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट
मुंबई प्रतिनिधी : विलेपार्ले (पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. व्ही.एन शिरोडकर प्रसूतिगृह येथील लसीकरण केंद्राला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिनांक ०६ मे २०२१ रोजी भेट देऊन लसीकरणाच्या उत्तम व्यवस्थेबद्दल संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले.याप्रसंगी आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल, के/पूर्व विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा प्रियंका सावंत, माजी नगरसेवक चंद्रकांत पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.उर्मिला पाटील उपस्थित होत्या.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८