कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंत्रालय येथे अभिवादन
मुंबई प्रतिनिधी : माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.उद्योगमंत्री देसाई यांनी उपस्थितांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त देशाची अखंडता, व सहिष्णूता यावर निष्ठा ठेवून सर्व प्रकारच्या दहशतवाद, हिंसाचाराचा मुकाबला करण्याची, सर्व मानवजातीत शांती, सामाजिक एकोपा, सामंजस्य टिकवित मानवी मूल्यांना धोका पोहचविणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु, अशी शपथ दिली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्रा, सहसचिव वारभुवन यांच्यासह विविध विभागाचे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.