माहे एप्रिलमध्ये मास्क परिधान न केलेल्या 4342 व्यक्तींकडून रु.21,71,000/- इतका दंड वसूल !
कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महापालिकेने विना माक्स फिरणाऱ्यावर कायद्याने कारवाई करित कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका दररोज विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत असूनही अजून काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालत फिरत असल्याचे दिसून येत आहे. माहे एप्रिलमध्ये घराबाहेर विना मास्क फिरणा-या 4342 व्यक्तींकडून महानगरपालिका कर्मचारी पथकाने पोलिसांच्या मदतीने रु.21,71,000/- इतका दंड वसूल केला.
महापालिका क्षेञातील कोरानाची साथ नियंञणात ठेवण्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क परिधान करून कोरोना विरुद्धच्या लढ्यात महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापलिकेमार्फत करण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८