आमदार मंगेश कुडाळकर व सहाय्यक अभियंता सुखदेव पाचारणे यांनी महापौरांना निधी दिला

 

मुंबई प्रतिनिधी : महापौर निधीसाठी आमदार मंगेश कुडाळकर यांच्याकडून २५ हजाराचा धनादेश महापौर  किशोरी पेडणेकर यांच्याकडे  सुपूर्द  महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  आमदार मंगेश कुडाळकर यांनी २५ हजार रुपयांचा धनादेश महापौर निधीसाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे आज दि. १४ जून  २०२१ रोजी सुपूर्द केला. याप्रसंगी  रजनी कुडाळकर, चित्रपट सेनेचे अभिनेते दिगंबर नाईक उपस्थित होते.

सहाय्यक अभियंता सुखदेव पाचारणे यांनी ५१ हजाराचा धनादेश महापौर निधीला देऊन पाडला वेगळा पायंडा 

   रस्ते विभाग (पूर्व उपनगरे) चे सहाय्यक अभियंता सुखदेव पाचारणे हे  दि. ३१ मे २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी  सेवानिवृत्तीच्या दिवशी जेवणावळी व इतर अनावश्यक खर्च टाळून ५१ हजार रुपयांचा धनादेश महापौर निधीसाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे आज दि. १४ जून  २०२१ रोजी सुपूर्द करून एक वेगळा पायंडा निर्माण केला आहे. सुखदेव पाचारणे यांनी सहाय्यक अभियंता अशोक तर्डेकर यांच्याप्रमाणेच  सेवानिवृत्तीच्या दिवशी कुठलाही प्रकारचा कार्यक्रम आयोजित न करता  होणारा अनावश्यक खर्च टाळून हा  निधी गोरगरिबांच्या आरोग्यासाठी मदत म्हणून देण्यात येणाऱ्या महापौर निधीसाठी  देऊन समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबद्दल सुखदेव पाचारणे  यांचे अभिनंदन करून त्यांचा  निर्णय इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. गोरगरिबांच्या आरोग्यासाठी हा निधी मदत म्हणून जाणार असल्यामुळे अत्यानंद होत असल्याचे महापौरांनी सांगितले. सुखदेव पाचारणे यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा महापौरांनी यावेळी व्यक्त केली.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८