महिन्याभरात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होणार
- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
या भागातील कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकास होणार असून सर्व कार्यालयाना एकाच इमारतीत सामावून घेतले जाणार आहे. या जागी बहुमजली आयकॉनिक इमारत उभी राहणार असून या इमारतीत सद्यस्थितीत वापरत असलेल्या जागेपेक्षा दुप्पट जागा या कार्यालयांना मिळणार आहे. याशिवाय सर्वसामान्य लोकांना आणि इमारतीत नव्याने बांधण्यात येणाऱ्या खासगी कार्यालयांना मुबलक पार्किंग सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय या इमारतीच्या बाजूलाच शाळेसाठी स्वतंत्र इमारत आणि मैदान बांधून देण्यात येणार आहे. तसेच, काही छोटी खासगी कार्यालये आणि पालिका बाजार सुरू करण्यासाठी काही गाळे उपलब्ध होणार आहेत. या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि इतर अधिकारी उपस्थित होते.