महिलांविषयक तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी - राज्यमंत्री शंभूराज देसाई
गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधाचे निकष पाळून महिला दक्षता समित्यांच्या बैठका सर्व जिल्हयात आयोजित कराव्यात. उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिलेल्या सूचनांसाठी जिथे गृह विभागातील सुधारणांची आवश्यकता आहे तिथे शासनाच्या नियंमानुसार योग्य ती कार्यवाही गृह विभागाने करावी, तसेच सातारा जिल्हयात फक्त पत्राव्दारे आलेल्या तक्रारींवरही पोलिसांनी कार्यवाही केली आहे हा उपक्रम स्तुत्य आहे. महिलांविषयक आलेल्या तक्रारींवर कुठल्याही प्रकारची दिरंगाई न होता तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री देसाई यांनी यावेळी दिले. यावेळी पोलीस ठाणेनिहाय महिलांच्या दक्षता समित्यांची पुनर्रचना करणे,ग्रामीण भागातील कोविड सेंटर मधील महिला रुग्णांची सुरक्षा, कोविडमुळे अनाथ झालेली बालके,महिला अत्यांचार घटनांची घेण्यात येणारी तात्काळ दखल,महिलांसाठी सुरक्षेच्या योजना, प्रत्येक जिल्हयाने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती पोलिस विभागाने दिली.