कोविड नियमांचे उल्लंघन करण्याऱ्याकडून रु.1,03000/- दंड वसूल!

कोविड नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या आस्थापनांकडून गेल्या दोन दिवसात रु.1,03000/- दंड वसूल!

 कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण  : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या  गेल्या  वर्षभरापासून महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्ण संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिका अनेकविध उपाययोजना राबवित आहे. कोविड साथ आटोक्यात ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, बार, रेस्टॉरंट तसेच इतर आस्थापना यांचेवर दंडात्मक कारवाई करणेबाबतचे निर्देश सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी यांना दिले आहेत. त्या निर्देशांच्या अनुषंगाने महापालिकेच्या प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी गेल्या 2 दिवसात पाहणी करून कोविड नियमांचे उल्लंघन केलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे  1 लाख 03 हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. यामध्ये आय प्रभागक्षेत्रात, प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांनी गेल्या 2 दिवसात कोविड नियमांचे उल्लंघन केलेल्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून रु.43,000/- दंड वसुली केली आहे. त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन केल्याने 1 दुकान सील केले आहे.  फ प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पाटील यांनी नियमांचे उल्लंघन केलेल्या दुकानांकडून रु.45,000/- दंड वसूल केला असून 2 दुकाने सील केली आहेत. अ प्रभागात प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी नियमांचे उल्लंघन केलेल्या आस्थापनांकडून रु.10,000/-  तर जे प्रभागक्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांनी नियमांचे उल्लंघन केलेल्या आस्थापनाकडून रु.5,000/- इतका दंड आकारला आहे.  इ प्रभागातही प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने 4 दुकाने सील करण्याची कारवाई गेल्या 2 दिवसात केली आहे.

   तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की महापालिका क्षेत्रात  कोरोना साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोविड नियमांचे कटाक्षाने पालन करावे आणि घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क परिधान करून  कोविडविरुद्धच्या लढाईत महापालिकेस सहकार्य करावे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८