9 /आय प्रभाग क्षेत्रात कोविड नियमांचे पालन न करणारी सहा दुकाने सील करण्याची धडक कारवाई !
covid-19 च्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका अविरतपणे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे असतानाही महापालिका क्षेत्रातील विविध आस्थापनांमध्ये (उदा. दुकाने/ हॉटेल्स/ उपाहारगृहे /फुड कोर्ट/ मद्यालये इ.)सामाजिक अंतर राखले जात नसल्याची त्याचप्रमाणे तेथे उपस्थित असलेले ग्राहक, कर्मचारी, व्यवस्थापक तोंडावर मास्क परिधान करत नसल्याची व विहित वेळेची मर्यादा न पाळता काल मर्यादेचे उल्लंघन करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे, यामुळे कोविड साथीचा प्रादुर्भाव/प्रसार वाढत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे महापालिका क्षेत्रात असलेल्या दुकानांमध्ये अथवा हॉटेल्स, फूड कोर्ट उपाहारगृहे मद्यालये इ. ठिकाणी आत किंवा बाहेर सामाजिक अंतर राखले जात नसल्याची,तेथील ग्राहक व कर्मचारी मास्क परिधान करत नसल्याची व विहित वेळेची मर्यादा न पाळता कालमर्यादेचे उल्लंघन करत असल्याची बाब निदर्शनास आल्यास कोविड संबंधी वेळोवेळी पारित होणाऱ्या आदेशानुसार, संबंधित दुकानदार आणि हॉटेल व्यवसायिक हे यापुढे द्रव्यदंडास पात्र ठरणार आहेत.
हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट या ठिकाणी पहिल्या भेटी दरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना रु 10,000/- दंड लागू केला जाणार आहे, अन्य आस्थापनांनी पहिल्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना रु. 5000/- दंड लागू केला जाणार आहे. दुसऱ्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास सदर हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट रु. 20,000 /- दंडास पात्र असतील,तर अन्य आस्थापनांनी दुसऱ्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना रु. 10,000/- दंड लागू होईल आणि तिसऱ्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास* covid-19 ची अधिसूचना संपुष्टात येईपर्यंत सदर हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट, दुकाने / आस्थापना सील करण्यात येईल* असे आदेश महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी निर्गमित केले आहेत.