आरक्षित भूखंडावर,सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने आज आंबिवली आणि टिटवाळा परिसरात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे हस्ते वृक्षारोपण !
या मोहिमेचा एक भाग म्हणून आज सकाळी अ प्रभाग क्षेत्र परिसरातील स्वराज्य नेपच्यून, आंबिवली पश्चिम व थारवानी प्रोजेक्ट, टिटवाळा या परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विदयमाने राबविल्या जाणा-या वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या मैदानावर मुलांना खेळण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल तसेच नागरिकांना देखील फेरफटका मारण्यासाठी या मैदानाचा उपयोग होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. यासमयी विभागीय उपआयुक्त अर्चना दिवे, महापालिका सचिव तथा मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, अ प्रभागक्षेञ अधिकारी राजेश सावंत, सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे त्याचप्रमाणे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचे संदिप भंडारी हे उपस्थित होते. यावेळी करंजा, सिताफळ, चिंच, कोकम,शिरीष या देशी झाडांची लागवड करण्यात आली.