उत्कृष्ट संसदपटू व भाषण पुरस्कारांनी
महाराष्ट्र विधिमंडळातील बारा सदस्य सन्मानित
यावेळी विधानपरिषद सदस्यांना पुरस्कारांतर्गत सन 2015-16 साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार ॲड. अनिल परब, 2016-17 साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार विजय ऊर्फ भाई गिरकर यांना तर 2017-18 साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार संजय दत्त यांना प्रदान करण्यात आला. 2015-16 साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार ॲड. राहूल नार्वेकर, 2016-17 साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार कपिल पाटील यांना तर 2017-18 साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रवीण दरेकर यांना प्रदान करण्यात आला.विधानसभा सदस्यांना पुरस्कारांतर्गत सन 2015-16 साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार डॉ.अनिल बोंडे, 2016-17 साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुभाष साबणे यांना तर 2017-18 साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार राहुल कुल यांना प्रदान करण्यात आला. 2015-16 साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रा.वर्षा गायकवाड, 2016-17 साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार राजेश टोपे यांना तर 2017-18 साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार धैर्यशील पाटील यांना प्रदान करण्यात आला.