महापालिकेच्या विविध प्रभागात अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई !
कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 10/इ प्रभागातील, नांदिवली येथील गणेश नगर मध्ये चालू असलेले (तळ + 1) इमारतीचे अनाधिकृत बांधकाम पिलर, मुळासकट काढून पूर्णपणे निष्कासित करण्याची कारवाई 10/इ प्रभागक्षेञ अधिकारी भारत पवार यांनी आज केली . सदर कारवाई 1 जेसीबी मशिन,1 कॉम्पप्रेसर व महापालिकेचे कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी यांचे मदतीने करण्यात आले. महापालिकेच्या 1/ अ प्रभागातही प्रभागक्षेञ अधिकारी राजेश सावंत यांनी मोहने येथील यादव नगर मधील विराट क्लासिक या इमारतीच्या समोर चालू असलेले अनाधिकृत बांधकाम, 1 जेसीबी , महापालिका कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने निष्कासित करण्याची धडक कारवाई काल दिवसभरात केली. तसेच महापालिकेच्या 5/ड प्रभागातही प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल यांनी काटेमानिवली येथील आरक्षित भुखंडावर अनाधिकृतरित्या सुरू असलेले मोबाईल टॉवरचे बांधकाम,1 जेसीबी, महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी यांच्या सहाय्याने निष्कासित करण्याची धडक कारवाई आज केली.