गृहनिर्माण संस्था चालविणे म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे असे समजले जाते. त्यात सदस्यांचे आरोप, टोमणे हे संस्था व्यवस्थापन संचालकांना जरी नवीन नसले तरी थोडाफार मानसिक त्रास होणे हे स्वाभाविक आहे.आजच्या लेखात विषयपत्रिका/कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय? त्याची उपयुक्तता काय असते? याबाबत माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० व नियम १९६१ अन्वये सहकारी संस्थांच्या सभांचे सभासदांच्या सभा व व्यवस्थापन समितीच्या सभा हे मुख्य दोन प्रकार पडतात.
सभासदांच्या सभाचे प्रकार
१) पहिली साधारण मंडळ सभा
२) अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा
३) अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा
४) अंतिम सर्वसाधारण सभा, तर व्यवस्थापन संचालकांच्या
१) समितीची पहिली सभा, २) समितीच्या मासिक सभा ३) उपसमितीच्या सभा.
वर नमूद केलेल्या सर्व सभांच्या विषय पत्रिका ह्या त्या त्या सभेच्या आवश्यकतेनुसार तयार करणे कायद्याने सचिवास बंधनकारक असते.
सभेची विषयपत्रिका म्हणजे, सभेमध्ये चर्चिल्या जाणाऱ्या विषयांची क्रमवार यादी होय. सभेच्या सुचनेसोबत विषय पत्रिका सभासदांना त्यांच्या लेखी पत्त्यावर पाठविली पाहिजे.संस्थेच्या अध्यक्षांशी चर्चा करून सचिव विषयपत्रिका तयार करतो. विषय पत्रिकेवरून सभेत कोणकोणत्या विषयावर चर्चा होणार आहे याची सभासद व संचालकांना पूर्व सूचना मिळते. अध्यक्षांच्या पूर्व परवानगी शिवाय विषय पत्रिकेत बदल करता येत नाही. सभासद व संचालक मंडळाच्या सभेचे कामकाज योग्य प्रकारे पार पडण्यास विषय पत्रिका उपयुक्त ठरते.
मागील लेख वाचण्यासाठी “व्ही लॉ सोल्युशन्स” या फेसबुकपेजची खाली दिलेल्या लिंकवर जाऊन लाइकआणि फॉलो करा
.https://www.facebook.com/vlawsolutions/