श्रीराम सेवा मंडळ मुलुंड मुंबई व पालगड यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ पार पडला.
प्रगतशील पिढीचे चिञ पंचक्रोशीतील रत्नागिरी जिल्यातील दापोली तालुक्यातील पालगड गावातील कातळवाडी येथे दिसू लागले आहे. आता त्यांना फक्त जोड हवी उच्च शिक्षण व स्पर्धा परिक्षा यांची यांचा जर ताळमेळ बसला की काही वर्षात चिञच पालटेल. काही गरीब आणि होतकरू कुटूंबीया पैकी विद्यार्थ्यांनी मिळवले यश वाखावण्याजोगे आहे. माध्पमिक उच्च माध्पामिक पदवी व पदविका परिक्षेमध्ये पालगड गावातील कातळवाडील सन २०२० व २०२१ या शैक्षणिक वर्षामध्ये मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. सालाबादाप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवार दि. ११ सप्टेंबर २०२१ रोजी दापोली तालुक्यातील पालगड येथील कातळवाडीतील श्रीराम मंदिरात पार पडला. त्यावेळी श्रीराम सेवा मंडळ मुलुंड मुंबई व पालगड ग्रामस्थ मंडळ सदस्य सीतामाई महिला मंडळ पालगड ग्राम पंचायत सदस्य साने गुरुजी हायस्कूलचे मुख्याध्यापक तांबडे गुरुजी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा शैक्षणिक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराच्या वेळी उपस्थित मान्यवरात ग्रामस्ध मंडळाचे अध्यक्ष सुरेश गौरत मुंबई अध्यक्ष प्रकाश येसरे मुंबई उपसचिव संतोष निवाते मुंबई प्रभाकर नटे अंनत भडवळकर अनिल गौरत भिकू भोसले सचिन जोगळे सुनिल उद्योग मुकेश भोसले अनिकेत गोरिवले दिनेश म्हापार्ले अंजना निवाते सविता बाईत यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये कृतिका संतोष निवाते व ओंकार नंदकुमार निवाते (बी. काॅम) सुकन्या दिलीप बाईत (आय.टी. इलेक्टिक मॅकेनिक) मिनल हरिश्चंद्र बाईत (ए. एन. एम.-नर्स) सुरेंद्र दिलीप बाईत (फायर सेफ्टी इंजिनिअर) विनिता दिलिप सापटे तन्वी बाळकृष्ण बाईत गिरिष्मा सुनिल उद्योग अभिषेक संजय भडवळकर विवेक भिकू म्हापार्ले संकेत संजय निवाते निखिल नंदकुमार मुकनाक सिद्भांत संजय उद्योग रोशन विनायक भडवलकर केतन मंगेश म्हापार्ले शुभम भिकू भोसले साहिल गणेश केसरकर
स्नेहा संजय म्हापार्ले संजना दिनेश म्हापार्ले साईराज संदिप खाडे (सर्व बारावी उत्तीर्ण) सलोनी संदिप गौरत आश्विनी हरिश्चंद्र महाडीक सायली गणेश केसरकर प्राजक्ता विलास पाटील दृष्टि सुनिल उद्योग निनाद संतोष निवाते प्रणव प्रदिप सापटे रूपेश दिपक रहाटवळ सुयश संजय भडवळकर यश किशोर बाईत सागर गणपत पाटील प्रणव प्रविण रहाटवळ सानिका विश्वास गौरत सिद्धेश अनंत म्हपार्ले साक्षी संजय म्हापार्ले प्रफुल प्रकाश बाईत (सर्व दहावी उत्तीर्ण) यांचा समावेश होता. मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या !