स्वामी समर्थ बहुउद्देशिय संस्था २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणे बाबत सरकारी कार्यालयाला निवेदन..
अंमलबजावणीच्या अपेक्षेत धन्यवाद....जनहितार्थ प्रतिसादाच्या अपेक्षेत !! कळावे...
अशा पद्भतीचे निवेदन "स्वामी समर्थ बहुउद्देशिय संस्था" मुंबई अध्यक्षा सविता वाघमारे यांच्या माध्यमातून महानगर पालिका सहाय्यक अभियंता धीरज बांगर साहेब, 'के' पश्चिम विभाग, अंधेरी, मुंबई यांना तसेच डी. एन. नगर. पोलिस स्टेशन, सहाय्यक पोलिस आयुक्त जोत्स्ना रासम यांना, त्याचप्रमाणे शिधावाटप कार्यालय क्रं. २५/ड अंधेरी, पश्चिम विलास शंखे साहेब यांना वरील पद्धतीचे निवेदन देण्यात आले. सर्व सामान्य जनता व शासन कार्यालय अधिकारी यांच्या माहिती अधिकारांची माहिती जनते समोर मांडून सर्वांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याची अमंलबजावणी करणे हा उद्देश आहे.
माहिती अधिकाराचे नोडल ऑफिसर म्हणून जिल्ह्यासाठी संदर्भ क्र.३ ने सन्माननीय जिल्हाधिकारी यांना नियुक्ती करण्यात आले आहे. संदर्भ क्र. १ व २, नुसार २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणेबाबत शासनाने निर्णय घेतले होते व आहेत. तरी विनंती की, २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन म्हणून आपल्या विभागात माहिती अधिकार बाबत जनजागृती या संदर्भाने कार्यक्रम घेणे गरजेचे व अपेक्षित आहे. संदर्भ क्र. १. नुसार तयार होणारा अहवाल. आम्ही जनहितार्थ माहिती अधिकारात मागवणार आहोत. तरी जनहितार्थ आपण सतर्क दक्ष जनसेवक अर्थात अधिकारी म्हणून याची अंमलबजावणी कराल.याकरिता वरील तत्सम यंञणेला "स्वामी समर्थ बहुउद्देशिय संस्था" मुंबई अध्यक्षा सविता वाघमारे यांनी २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्यासाठी निवेदन दिले.