कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
राहूल पांडे यांनी घेतली राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ
मुंबई प्रतिनिधी : राहूल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या दालनात शपथविधी समारंभ झाला.राज्य शासनाने राज्य माहिती आयुक्त या पदावर राहूल पांडे यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून 16 सप्टेंबर 2021 च्या अधिसूचनेनुसार नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे राज्य माहिती आयुक्त, नागपूर खंडपीठ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.