पहिल्या राज्याभिषेक सोहळ्या इतकेच दुसऱ्या राज्याभिषेक सोहळ्याला ही महत्व आहे. या ऐतिहासिक दिवसाची आठवण ठेऊन त्या इतिहासाचा जागर करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले होते. संभाजी ब्रिगेड गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी २४ सप्टेंबर या दिवशी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे. महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक कोणत्या पद्धतीने झाला यावरुन सुरु असणाऱ्या वादात न पडता या ऐतिहासिक दिवसाचे महत्व टिकून राहिले पाहिजे यासाठी दरवर्षी साक्त पद्धतीने महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडतो.
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तसेच समविचारी संघटना यांचे माध्यमातून किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना (कोविड-१९) च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून हा सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्यासाठी प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड सुधीर राजेभोसले हिंदुराव गुजरे पाटील सुभाष बोरकर अमोल काटे आत्माराम शिंदे विभागीय अध्यक्ष सचिन देसाई सागर भोसले दीपक वाढदेकर योगेश धानोरकर बालाजी शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.