राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा पथकाच्या कारवाईत 31 लाख रुपये किमतीचा बनावटी विदेशी मद्यसाठा वाहनासह जप्त
छाप्यात वाहनामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्यांचे इम्पेरियल ब्ल्यु रिझर्व सेव्हन इम्पेरियल ब्ल्युरॉयल स्टॅग, गोल्डन एस ब्ल्यु व्हिस्को तसेच गोल्ड ॲन्ड ब्लॅक XXX रम व ग्रीन अॅपल वोडका या ब्रँडच्या 750 मिली व 180 मिली क्षमतेच्या बाटल्या असलेले एकुण 325 बॉक्स व टुबर्ग स्ट्रॉग बिअरचे 500 मिलीचे टिनचे 05 बॉक्स असे एकुण 330 बॉक्स इतके मद्य मिळून आले असून त्याची बाजारभावानुसार एकूण रु.21,40,200/- इतकी किंमत असुन गुन्ह्यांत मिळून आलेले वाहन यांची मिळुन 10,00,000/- इतकी किंमत असुन एकुण जप्त मुद्देमालाची किंमत रु.31,40,200/- इतकी आहे.गुन्ह्यांतील पसार आरोपी इसमांचा शोध सुरू असल्याचे पथक प्रमुख निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले. कारवाईत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक कोल्हापूरचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक संजय मोहिते, विजय नाईक, जवान सर्वत्री संदीप जानकर सागर शिंदे, सचिन काळेल. मारुती पोवार राजु कोळी जय शिनगारे यांनी सहभाग घेतला.गुन्ह्याचा पुढील तपास चालु आहे असे निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले.