वाढती चोरी व लहान मुले महिलांच्या संरक्षण आणि गैरप्रकाराला आळा घालण्या करिता ठाणे प्रभाग क्र. १४ मध्ये सी.सी. टि.व्ही कॅमेर्याचे उद्घाटन संपन्न
ठाणे प्रतिनिधी मिलिंद महाडीक : २९ सप्टेंबर २०२१ रोजी ठाणे लोकमान्य नगर प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविका आशाताई संदीप डोंगरे यांनी वाढती चोरी गैरप्रकार लहान मुले आणि महिलांच्या संरक्षण करिता प्रभागात सी.सी.टी.व्ही लावले. त्याच प्रमाणे त्यांनी शिव साई वृंदावन सोसायटी मध्ये आणि सी.सी.टी.व्ही. सोसायटीच्या सभोवताली लावून दिले.सोसायटीच्या सभासदांनी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. योगेश हरिश्चंद्र साळुंके यांच्या हस्ते नारळ फोडून आशा ताई संदीप डोंगरे यांच्या कडून महिलांना छत्र्या वाटपाचा कार्यक्रमही करण्यात आला.