ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडांवरील अनधिकृत बांधकामांवर त्वरीत DPL (कायदेशीर विहीत प्रक्रिया) सुरु करावी ! -आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडांवरील अनधिकृत बांधकामांवर त्वरित DPL (कायदेशीर विहीत प्रक्रिया) सुरु करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिले. अनधिकृत बांधकामांबाबत महानगरपालिकेत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असतात. त्यामुळे ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकामांवर त्वरीत DPL सुरु करावी, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी आज संपन्न झालेल्या आढावा बैठकीत सर्व प्रभागाच्या सहा. आयुक्तांना दिले. 30 वर्षापेक्षा जुन्या परंतू रहिवास असलेल्या अनधिकृत इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेणेबाबत संबंधितांना नोटीसद्वारे कळवावे आणि तद्नंतर सदर इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवाला अंती त्यांना धोकादायक घोषीत करणेबाबतची कार्यवाही करणेबाबतचे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.
रस्ते सफाईसाठी प्रत्येक पार्षद प्रभाग निहाय नियोजन करुन साफसफाई करावी,तसेच डासांचे प्रमाण वाढले असल्यामुळे नियमित स्वरुपात जंतूनाशक फवारणी व धुरावणी करावी, असेही निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८