औरंगाबाद जिल्ह्याकडे पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण करणार
लसीकरणाविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन कवचकुंडल अभियान’ राबवून लसीकरण वाढविले आहे. ‘मन में है विश्वास’ हा कोरोना विरूद्धच्या लढाईत मनोबल वाढविणारा उपक्रम आम्ही राबविला. या कार्यक्रमात विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते तसेच आर्मीचा देखील सहभाग होता. हा कार्यक्रम यापुढेही सुरू राहणार असून त्याची व्याप्ती अधिक वाढविण्यात येईल. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या पहिल्या 25 गावांना विशेष निधी देण्यात येणार आहे. शहरी तसेच ग्रामीण भागासाठी ‘मेरा वार्ड सौ प्रतिशत टीकाकरण वार्ड’, ‘संतांची भूमी शंभर टक्के लसीकरण भूमी’ असे वेगवेगळे प्रयोग करून जिल्ह्यात लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितले.