ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क मुंबई आयुक्त कांतीलाल उमाप राज्य उत्पादन शुल्क, ठाणेचे विभागीय उप-आयुक्त सुनिल चव्हाण अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा तसेच मुंबई शहर अधीक्षक सी.बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क “आय" विभाग मुंबई शहर कार्यालयाने केली असून वरील सर्व विदेशी मद्य नाताळ व नववर्षे सणानिमित्त विक्री करण्याचा उद्देश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास विनोद जाधव, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आय विभाग मुंबई शहर हे करीत असून जवान एस.एस. जाधव यांनी गुन्ह्याची फिर्याद दिली.
तरी जनतेस आवाहन करण्यात येते की, बनावट मद्य निर्मिती वाहतूक विक्री यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र. १८०० ८३३ ३३३३ व व्हॉटस अप क्र. ८४२२००१९३३ संपर्क साधावा असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.