मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात आयोजित या अनावरण कार्यक्रमाला उच्च न्यायालय विधी सेवा समिती मुंबईचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. एस. शिंदे न्यायमूर्ती पी.बी. वराळे आणि न्यायमूर्ती एस.जे. काथावाला उपस्थित होते.
या टेबल कॅलेंडरमध्ये राज्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती द्वारे प्रत्येक महिन्यात आयोजित केलेल्या विशेष दिवसांची आणि इतर समान किमान कार्यक्रमांची यादी आहे. कॅलेंडरमधील प्रत्येक महिना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विशिष्ट योजनेसाठी समर्पित आहे. या सर्व योजना आणि समान किमान कार्यक्रम याद्वारे गरजू व्यक्तींची सेवा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे नियोजित समान किमान कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तालुका विधी सेवा समिती आणि काही सरकारी कार्यालयांमध्ये हे टेबल कॅलेंडर वितरित केले जातील असे न्यायमूर्ती ए.ए. सय्यद आणि न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांनी यावेळी सांगितले.